सैनिक टाकळी / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
आयुष्यभर शिकत राहणे हा मनुष्याचा स्थायी भाव आहे विद्वतेला विश्वामध्ये जो कायमस्वरूपी सन्मान मिळतो तो इतरत्र मिळत नाही असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले. ते स्व. मालतीताई शामराव पाटील मेमोरियल ट्रस्ट वतीने नृसिंहवाडी येथे आयोजित विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शना मध्ये बोलत होते. यावेळी तालुक्यातील विध्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विश्वास नांगरे पाटील पुढे म्हणाले आयुष्यामध्ये कधी छोटे व्हायचे कधी मोठे व्हायचे हे कळले पाहिजे. छोट्याश्या अभिमानासाठी आपण आपली नाते तोडली नसली पाहिजे. परिस्थिती नेहमीच बदलत असते सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास कोणतेही यश सहज शक्य आहे. आजचे काम आज केले पाहिजे आरामाने आपल्या बुद्धीलागंज गंज चढतो. मानसिक, शारीरिक, अध्यात्मिक क्षमता वाढवणे जीवनाचा गुणधर्म आहे. जगामध्ये ईश्वराने फार मोठे चित्र रेखाटले आहे याचा आनंद लुटता आला पाहिजे.
राष्ट्रीय संपत्ती जपणे हि सर्व सामान्य नागरिकांची जवाबदारी आहे हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे स्वतःसाठी जगणे प्रवृत्ती दुसऱ्याचे लुबाडून खाणे विकृती तर उपाशी राहून दुसऱ्याला खाऊ घालणे हि संस्कृती आहे. समाजामध्ये आपण कोणीतरी आहोत हे गृहीत धरावयास हवे. स्पर्धा परीक्षेसाठी विविध विषयाची पुस्तके वाचन होणे आवश्यक आहे जिद्ध, चिकाटी, कष्ट सकारात्मक दृष्टीकोन सातत्याने ठेवल्यास १००% यश मिळू शकते.
कार्यक्रमाचे स्वागत ट्रस्टी सुशांत पाटील यांनी केले तर प्रास्तविक ट्रस्ट चे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले. आभार कुरुंदवाड नगरीचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील मानले.