निर्भीडसत्ता न्यूज –
येथील उन्नती सोशल फौंडेशन मार्फत पिंपळे सौदागर येथील वाचकांसाठी ” विठाई ” मोफत वाचनालयाची स्थापना केली . यामध्ये मराठी , हिंदी व इंग्रजी अशी मिळून तब्बल १५००हुन अधिक पुस्तके उपलब्ध केली आहेत . याप्रसंगी वाचनालयाचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले .
माणूस हा पुस्तकांमधूनच घडतो , त्यामुळे पुस्तकेच काळाची गरज आहे , असे मार्गदर्शन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले . विठाई वाचनालयाचे अध्यक्षं सुभाष पवार यांनी वाचनालयामध्ये असलेली पुस्तके व त्यांचे महत्व यावर मार्गदर्शन केले . तर मार्गदर्शन पर व्याख्यान प्रदीप कदम यांनी केले .
यावेळी पिंपळे सौदागर प्रभागाचे नगरसेवक शत्रूघ्न काटे , नगरसेविका निर्मला कुटे , उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे , संस्थापक संजय भिसे, डॉ . गिरीश प्रभुणे , यशदा रिऍलिटी ग्रुप चे चेअरमन वसंत काटे , ग्रॅव्हिटी लॅन्डमार्क्स चे चेअरमन राजू भिसे,विजय भिसे , आनंद हास्य क्लब चे सर्व सभासद , ऑल सिनियर सिटीझन अससोसिएशन चे सर्व सभासद , नवचैतन्य हास्य क्लब चे सर्व सभासद , पिंपळे सौदागर येथील सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्तिथ होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोत्रे -पाटील यांनी केले ,तर कार्यक्रमाची सांगता नवचैतन्य हास्य क्लब चे सदस्य राजेंद्र पाटील यांनी आभार मानून केले .