निर्भीडसत्ता न्यूज –
विधानसभा निवडणुकीवेळी वेळ बघून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलात. पण जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देखते है मुख्यमंत्री तुम्हे कितना सांभालता है, असा टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना लागविला.
भाजप सरकारच्या कारभाराविरोधात काळेवाडी येथे आयोजित हल्लाबोल आंदोलनाअंतर्गत जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा समाचार घेतला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, चित्रा वाघ, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, संजोग वाघेरे, योगेश बहल, नाना काटे आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, वेळ बघून तुम्ही राष्ट्रवादीशी दगा केला. पण जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देखते है मुख्यमंत्री तुम्हे कितना सांभालता है, असा टोलाही लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पोरं जगतात आई मेली तरी.. त्यामुळे संघटना जगेल नक्की… असे गद्दार गेले तरी, अशा शब्दात हल्ला चढविला. तसेच आता गद्दारांना पक्षात थारा दिला नाही पाहिजे. जे आहेत त्यांना पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.
माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, दादांना सोडून गेलेले आज चड्डी घालून फिरत आहेत. यांनी नागपूरला जाऊन हाफ चड्डीची फूल पॅन्ट करून घेतली आहे. सत्ता जाते येते पण विचार बदलला नाही पाहिजे. ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, त्यांना विसरता कामा नये. तुम्हाला घर वापसी करायची असेल तर करून घ्या. जागा शिल्लक आहे. आता राज्यातील वातावरण बदलत आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेले सगळे परतीच्या मार्गावर आहेत. प्रवेश करून घेण्यासाठी एक मंत्री नेमावा लागेल, असेही ते म्हणाले.