निर्भीडसत्ता न्यूज –
डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर सोमवारी रात्री ११च्या सुमारास रस्त्यात असलेल्या विद्युत पथदिव्याच्या खांबाला रिक्षा धडकून झालेल्या या अपघातात एक रिक्षाचालक ठार झाला आहे. सतिश गोविंद पंडागळे (वय ५७) असे या अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
पंडागळे हे रात्री डांगे चौकातून घरगुती समान घेऊन येत असताना हिंजवडी रस्त्यावर रस्त्यात मध्येच असलेल्या खांबाचा अंदाज न आल्याने रिक्षाची जोरदार धडक खांबाला बसली. उपचारासाठी त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्य़ात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.