निर्भीडसत्ता न्यूज –
आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळ्यासाठी आलेल्या दोन महिला वारक-यांचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मोशीमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
जनाबाई अनंता साबळे (वय 55) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60, रा. जलालपूर, ता. परळी, जि. बीड) अशी या महिला वारक-यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याेच पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून दिंड्या व वारकरी देहू-आळंदीत दाखल होत आहेत. बीड जिल्ह्यातील परळीतून आलेल्या जनाबाई आणि सुमनबाई या वारकरी होत्या. मोशी मधील बो-हाडेवस्ती येथे मंगळवारी (दि. 3) रात्री त्या मुक्कामाला होत्या. पहाटे जनाबाई आणि सुमनबाई यांना अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दोघीही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत तपास करीत आह.