निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत असे एकूण पावणेपाच हजार मतदार वगळण्यात येणार आहेत. त्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने गुरूवारी (दि.27) मंजुरी दिली आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण 399 यादी भागातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरु आहे. हे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकार्याकडून केले जात आहे.
राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या 10 मे 2018 नुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील पिंपरी,चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात छाणणीचे काम सुरू आहे.
गुरूवारच्या सभेत त्या यादीस मंजुरी देण्याचा प्रस्ताव नगरसेवक विलास मडिगेरी यांनी मांडला. त्यास नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. महापौर राहुल जाधव यांनी त्यास मंजुरी दिली.