पुणे :
आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी चक्रा व ‘संस्कृतीकी’संस्था यांच्या सहयोगाने भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत दिनांक २६ व २७ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भरत नाट्यम, कथ्थक, ओडिसी,मणिपुरी, कुचीपुडी, मोहिनी अट्टम , लावणी, फ्लेमेंको, सत्तरिया, छाऊ, कथ्थक, मोहिनी अट्टम इ. नृत्यप्रकार दोन दिवसात सादर केले जाणार आहेत, अशी माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे तसेच महोत्सव संयोजक रसिका गुमास्ते यांनी दिली.
महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ नृत्यांगना गुरु मनीषा साठे,शमा भाटे ,सुचेता चाफेकर, व श्यामहरी चक्रा यांच्या हस्ते होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चेन्नई, बंगलोर, भुवनेश्वर, मुंबई येथील अनुसुया राव, अमरनाथ घोष, प्रियांका भिडे आदी कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत.हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. भारतीय विद्या भवन च्या सेनापती बापट रस्त्यावरील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात तो होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत वेळ राहील.