सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ११ दिवसात ११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रेक्षक सहकुटुंब चित्रपट पहाण्यासाठी येत आहेत.
‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, इंदापूर, नगर, श्रीरामपूर, शिरुर, सोलापूर, दौंड, लोणावळा, सांगोला, जेजुरी, पंढरपूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा, धुळे, मालेगाव, जामखेड, अमरावती, खेड, कणकवली, देवगड, राहुरी, टेंभूर्णी, सिन्नर, अकलूजसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात सर्व छोट्या – मोठ्या गावात प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे ३५८ हून अधिक चित्रपटगृहात ७५५ पेक्षा जास्त शो होते, सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा २.० चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाही ‘मुळशी पॅटर्न’च्या लोक्प्रीयेतेवर परिणाम झाला नाही. या चित्रपटाची निर्मिती अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची आहे.