निर्भीडसत्ता न्यूज –
रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या रनमॅरेथॉन ऑफ होप २०१८ च्या मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या सचिन पाटील याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत सात हजार स्पर्धकांनी भाग घेतला.
रोटरी क्लब ऑफ निगडी आयोजित रनेथॉन ऑफ होप २०१८ च्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सात हजार जण सहभागी झाले होते. निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 27 येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून रविवारी सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रो. अभय गाडगीळ यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्सचे प्लॅान्ट हेड आर.के. सिंग, टाटा मोटर्सचे अचिंत्य सिंग, एसकेएफ कंपनीचे व्यवस्थापक सतीश परळीकर, टीजेएसबी बँकेचे संचालक दिलीप सुळे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, सचिव प्रवीण घाणेगावकर, प्रेसिंडेंट इलेक्ट सुभाष जयसिंघानिया, उपाध्यक्ष विजय काळभोर, रो. श्रीकृष्ण करकरे, चंद्र छाब्रा, ईश्वर ठाकूर, अनिल कुलकर्णी, अर्जुन दलाल, शेखर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा चॅरिटी आणि स्पर्धा या दोघांचा संगम असून त्यात एकाच दिवशी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती घेण्यात आल्या. मुले- मुली तसेच स्त्री-पुरूष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धा पार पडली. दुस-या टप्प्यात लहान मुलांच्या स्पर्धेला महापौर नितीन काळजे यांची फ्लॅग ऑफ दाखविला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा 12 ते 14 आणि 14 ते 16 या दोन वयोगटात ही स्पर्धा झाली. याशिवाय अन्य वयोगटातही स्पर्धा झाली. यामध्ये 5 किमीची स्पर्धा खुल्या वयोगटासाठी तर 2 किमीची धर्मादाय स्पर्धा उद्योग क्षेत्रासाठी होती. यावर्षी एकूण 4 लाख 15 हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके देण्यात आली. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला पदक देण्यात आले. तसेच 21 आणि 10 किमीच्या शर्यतीत सहभागी होणा-या 45 वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या असणा-यांसाठी यावर्षी विशेष पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे प्रायोजक हे हॉटेल डबल ट्री, सिसका एलईडी, सँडवीक एशिया, टाटा मोटर्स, एसकेएफ इंडिया, एमरसन, एनप्रो आणि टिजेएसबी हे होते. नियोजनबद्ध अशी व्यवस्था रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने करण्यात आली होती.
खेळाला प्रोत्साहन देऊन फिटनेस बाबत जागृती करणे यासह वेगवेगळ्या संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या सोशल सर्व्हिस प्रोजेक्ट्साठी मदत निधी उभारणे हा आमचा उद्देश आहे. गरजू व्यक्तींपर्यंत पोहचून त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविणे हे यंदाच्या रनेथॉन फॉर होपचे घोषवाक्य आहे. सहभागी स्पर्धकांसाठी रनेथॉन नेहमीच जीवनाच्या वेगवेगळ्या प्रवासातून जात असते. केवळ मदत निधी उभारणे एवढाच या स्पर्धेमागचा उद्देश नसून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मात्र एकच छंद आणि आवड असणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा रोटरी क्लबचा या उपक्रमामागील हेतू आहे. सर्वांगीण समाज सुधारणा सामाजिक एकता हा रोटरी इंटरनॅशनलचा उद्देश असून वेगळेपण (मेकिंग अ डिफ्रन्स) ही या वर्षीची संकल्पना आहे, असे रोटरी क्लबने सांगितले आहे.
रोटरी क्लब ऑफ मॅरेथॉन २०१८ चा निकाल
महिला (२१ किलोमीटर ४५ वर्षाच्या आतील) – नयन किरदात, विनया मालसुरे, कविता रेड्डी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय यांनी क्रमांक मिळविले. ४५ वर्षाच्या पुढील – लिलाम्मा अल्फोन्सा, जुई डोंगरे यांना प्रथम, द्वितीय क्रमांक मिळाले. २१ किलोमीटर पुरुष ४५ वर्षाच्या आतील सचिन पाटील, अनंत टीमन, राजकुमार चौधरी यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, असे क्रमांक मिळाले. तर ४५ च्या पुढील वयातील अशोक अमाने, उदय महाजन, अविनाश माने यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिऴाले. कंपनीमधील निकालात एनप्रो, ऑर्ली कॉन, ब्रिस्टन या कंपन्यानी पारितोषिके पटकाविली.
महिला (१० किमी ४५च्या वर्षाच्या आतील) – प्रियंका चावरकर, शितल भगत, कविता भोईर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळाले, तर ४५ वर्षाच्या पुढीलमध्ये उषा पाटील, डॉ. अनिता डांग, विदुला साठे यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळविले. तर ४५ वर्षाच्या आतील १० किलोमीटरमध्ये – स्वप्नील सावंत, गिरीश वाघ, राहूल देशमुख तर ४५च्या पुढील मध्ये – रवी कळसे, महेंद्र बजारे यांनी प्रथम, द्वितीय असे क्रमांक मिळविले.
मुलींमध्ये १६ वर्षाच्या आतीलमध्ये – निकिता बोंगार्डे, निकिता हजारे, सिमरन मकानदार यांनी तर मुलांमध्ये महादेव कुंभार, विशाल कोळी, तेजस नरमाने यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळविले. तर १४ वर्षाच्या आतील गटात मुली – प्रिती चव्हाण, शीतल बोरगावे, निकिता कोळी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तर मुलांमध्ये १४ वर्षाच्या आतीलमध्ये ओंकार पन्हाळकर, आकाश टिपरे, ओंकार पाटील यांनी क्रमांक पटकाविले.