निर्भीडसत्ता न्यूज –
हिंजवडीतील आयटी कंपनीत संगणक अभियंता असलेल्या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी सकाळी घडली.
अभिजित रामदास मुळ्ये (वय 38, रा. गिरिराज हाउसिंग सोसायटी, बिजलीनगर, चिंचवड. मूळ गाव कळंब, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हे संगणक अभियंता असून, हिंजवडीतील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहेत. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतला. याबाबत माहिती मिळताच, चिंचवड पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी अभिजित यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.