निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी राहूल जाधव यांची वर्णी लागली. परंतु,या निमित्ताने सध्या राज्यात भाजपवर सडकून टिका करणा-या मनसेने भाजपला साथ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण, मनसेने भाजपला या निवडणुकीत केवळ राहूल जाधव पुर्वाश्रमीचे मनसे नगरसेवक असल्यामुळे दिली असल्याचे मनसे गटनेते सचिन चिखले यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात सचिन चिखले म्हणाले की, नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक पदी २०१२ ते २०१७ या दरम्यान होते. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे तीन नगरसेवक व मनसेचे चार नगरसेवक असे मिळून ७ नगरसेवकांचा एक गटतयार होत होता. त्यावेळेस माझ्यामुळे हा गट तयार झाला नाही व राहुल जाधव यांचे स्थायी समितीचे सदस्य होण्याचे स्वप्न भंगले गेले. त्याचे ऋण मी आज फेडले.
काल सर्व प्रसार माध्यमांच्या समोर नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव हे सांगायला विसरले नाहीत कि माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणतीही जातपात न पाहता पहिल्यांदाच मनसेच तिकीट दिले होते. त्यामुळेच मी सर्वसामन्य मनसैनिकाचा चिखली या प्रभागातून नगरसेवक होऊ शकलो व आज महापौर झालो. असे बोलून त्यांनी राजसाहेबांचे आभार मानले. महापौर हा कोणत्याही पक्षाचा नसून तो नागरिकांचा असतो जो माझ्या राज साहेबांना विसरू शकला नाही. त्यामुळे मनसेच एकमेव मतदान राहुल जाधव यांना मी केलेले आहे आणि उपमहापौर पदासाठी मनसे तटस्थ राहिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चिखले यांनी दिल्या आहेत.