निर्भीडसत्ता न्यूज –
‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) आणि ‘जॉबीझा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल युगातील नोकरी क्रांती आणि कौशल्य : २०२५ मधील करियर’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन आले होते.
‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी प्रास्ताविक केले.
या चर्चासत्रात जितेंद्र सोनार (महाव्यवस्थापक, ऑटोलाइन इंडस्ट्रीज लि.), उद्धव जोशी (ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. लि., एच आर प्रमुख), नीरज गुप्ता (नॉर ब्रेमेझ टेक्नॉलॉजी सेंटर इंडिया प्रा. लि.) यांनी मार्गदर्शन केले.
हे चर्चासत्र शुक्रवारी सायंकाळी ‘आय एम ई डी’, भारती विद्यापीठ, पौड फाटा, एरंडवणे येथे झाले. चर्चासत्राला विविध उद्योगांचे मानव संसाधन व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्ष सहभागी , प्राद्यापक, विद्यार्थी झाले होते.