यंदाचा पर्यावरण जागृती पुरस्कार 2018 जाहीर
प्रतिनिधी : वाकड
निर्भीडसत्ता न्यूज –
देशाच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बजरंग दल थेरगाव दत्तनगर शाखेच्या वतिने एकता मित्र मंडळ चौकामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दत्तनगर परिसरातील माजी सैनिकांना निमंत्रीत करण्यात आले होते.
या वेळी वाकड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष पाटील, हरीष माने यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. बजरंग दल शाखा दत्तनगर यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गत वर्षीचा पर्यावरण जागृती पुरस्कार सण 2018 हा थेरगाव सोशल फाउंडेशनला देण्यात आला. पर्यावरण संवर्धन, शहर स्वच्छता, गरजूंना मदत तसेच शहर विद्रोपीकरणा विरोधातील कौतुकास्पद कामगीरी साठी हा पुरस्कार देण्यात आला.
फाउंडेशनच्या तरुणांनी हा पुरस्कार स्विकारला. पुरस्कार मिळाल्याने काम करण्यास नक्कीच अजून उर्जा मिळणार आहे आमची जबाबदारी वाढली असून यापुढेही सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनचे काम जोमाने सुरु राहील असा विश्वास फाउंडेशनच्या तरूणांनी व्यक्त करत बजरंग दल शाखेचे मनापासून अभार मानले.
कार्यक्रमास परिसरातील नागरीक उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थीत होते. थेरगाव दत्तनगर बजरंद दल शाखे कडून या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.