वाकड : प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
टाटा मोटर्स समाज विकास केंद्रा कडून सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी गुण गौरव समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाज विकास केंद्राच्या थेरगाव विभागा कडून हॉटेल सतिश एक्झीकेटिव्ह या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास टाटा मोटर्स चे असिस्टंट जनरल मॅनेजर महेश महाजन, एच आर विभागाचे सतीश मोटे तसेच ईंद्रपाल सिंह या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. समाज विकास केंद्राचे अध्यक्ष रमेश ठाकरे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर सुरेश चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले अभार विशेष कार्यकारी अधिकारी संजीव असवले यांनी मानले.