निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे 72 व्या स्वतंत्र दिनांनिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंवड महापालीकेच्या नगरसेविका सुलोचना शिलवंत, केंद्र उपसंचालीका सुरेखा मोरे, माधवी खुने, संगिता खोमणे, शैलैजा आवडे, उपाध्यक्ष विकास शहाणे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता जोगदंड, गूणवंत कामगार गोरखनाथ वाघमारे यादव तळोले,भगवान पाटील, एस. डी. विभूते, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर,हेमंत नेमाडे ईश्वर सोनोने, सचिन नेमाडे, अरविंद मांगले, वसंत चकटे, आमोल गोवरदिपे,राहुल शेडगे,चंद्रकांत भालेराव, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सचिव, सुनील रोकडे, सहसचिव पंडित वनस्कर आदि उपस्थित होते.
सुलोचना शिलवंत म्हणाल्या, स्वातंत्र लढ्यासाठी सुभाष चांद्रबोस यांनी “तुम मुझे खून दो मै तुमको आझादी दूँगा “हे वाक्य स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देत होते. त्यांनी देशासाठी आझाद हिंद सेनेची केलेली स्थापना अनेक क्रांतिवीर फासावर लटकले याची आठवण त्यांनी करून दिली.
शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले, भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या विरपुत्रांणा व शाहिद कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज कालची बरीच तरुण पिढी राष्ट्रीय सणाला साजरा न मौज मजा व भटकंती करण्यात धन्यता मानतात. प्रत्येक तरुणाने यादिवशी तरी वंचितांसाठी व सामाजिक कार्यासाठी व देशहितासाठी थोडा वेळ द्यावे.
यावेळी केंद्र संचालक सुरेश पवार यांनी कामगारांसाठी शासनाच्या विविध योजनांची व कामगार रांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली.भाग्येश भालेराव या लहान मुलाने पटनाटय सादर केले. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात अपंगत्व आलेले माजी सैनिक नारायण शिंदे व मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड हस्ते लहान मुलांना खाऊचे वाटप करणयात आले .