निर्भीडसत्ता न्यूज –
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या ‘आभाळमाया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ‘अक्का’ अर्थात शुभांगी जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. शुभांगी जोशी यांनी मुंबईत वास्तव्यास होत्या. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे झोपेमध्ये असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. ‘आभाळमाया’ असो किंवा ‘काहे दिया परदेस’. प्रत्येक मालिकेमध्ये त्यांची भूमिका विशेष गाजली होती. कलर्स वाहिनीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. मात्र त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे.