निर्भीडसत्ता न्यूज –
मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर (वय ८४) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबात तीन विवाहित मुली आहेत. त्यांच्या पार्थिवावर सकाळी शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.