निर्भीडसत्ता न्यूज –
2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘माय अर्थ फाऊंडेशन’, ‘एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया’, ‘महा एनजीओ फेडरेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा, आदर्श पुणे अभियान -स्वच्छता यात्रा’ चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.३० वाजता यात्रेस पर्वती पायथा शनी मंदीर येथून प्रारंभ झाला. जनता वसाहत मार्गे वाघजाई माता चौक, जनता वसाहत येथे यात्रेचा समारोप झाला.
गांधीजींच्या वेशभूषेत मुलांचा, कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग होता. ‘माय अर्थ फाऊंडेशन’ चे अध्यक्ष अनंत घरत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मुकुंद शिंदे, शेखर मुंदडा, विजय वरूडकर, महेंद्र घागरे, लोकेश बापट, ललीत राठी, सुरज लोखंडे, तानाजी लोहकरे, किशोर राजपूत, प्रसाद चावरे, रमेश लडकत, संध्याताई बोमण्णा, सोहिनी डांगे इत्यादी सहभागी झाले. परिसरातील नागरिकांना स्वच्छता, व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.