निर्भीडसत्ता न्यूज –
लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणुन ‘सर्गा क्षेत्र कल्चर आणि चॅरिटेबल सेंटर, कोट्टायम, केरळला काही आवश्यक वस्तू पाठविल्या आहेत, यात पूरग्रस्तांसाठी कपडे, अन्नपदार्थ, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ह्या योगदानांचा उद्देश केरळ राज्यातील पूरग्रस्त भागातील प्रभावित लोकांना मदत करणे हा आहे. ही मदत देण्यासाठी लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने पुढाकार घेतला आहे.
लीला पुनावाला फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा, फाऊंडेशनचे आधार स्तंभ फिरोझ पूनावाला, लीला फेलो, रिता शेटीया, करिश्मा तनपुरे , माधुरी नलावडे , कश्मिर, मरीन यांनी सहभाग घेतला.
केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घालून आपत्त्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील अनेक घरे उध्वस्त झाली असून पूरग्रस्तांना अनेक राज्यातून, संस्थांमार्फत विविध माध्यमातून सहाय्य केले जात आहे. केरळ राज्य हा भारताचा अविभाज्य घटक असून त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. अशी आपत्तीजनक परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये कोणाच्याही मागे उभे राहण्याची महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे.
दरम्यान, या वेळी सर्वानी एकत्र उपस्थित राहुन कपडे, अन्न आणि इतर जीनवआवश्क वस्तू तांदूळ, गहू, साबण, टॉवेल, चहा पावडर, डिटर्जंट गरजेच्या अश्या दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे ३०० संच पाठविले. यावेळी सर्व राशन सामग्री आणि सहायता राशिची देखरेख लीला फेलो यांनी केली. फाऊंडेशनच्या वतीने मुली स्वता: केरळच्या कोट्टायम क्षेत्रातील प्रभावित आणि गरजू लोकांना वितरण करण्यासाठी जात आहेत.