बाळ शालेय वयापूर्वी मूले शारीरीक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर फार वेगाने बदल दाखवत असतात. या वयात त्यांचे मूड व भावना अतिशय गोंधळात टाकणार्या असतात. ते त्यांची मनस्थिती रडणे चिडखोरपण आणि अनियंत्रित उर्जेद्वारे दर्शवित असतात.
‘आरोग्य’ तुम्हाला मुलांना चांगल्या प्रकारे ओळखण्यास /समजून घेण्यास, त्यांच्या भावनिक चढ उतारांमधे मदत करेल. त्यांचे हात पाय खूप छोटे आहेत, ती मुले लहान कपडे वापरतात, लहान खेळणी त्यांना आवडतात,
परंतू त्यांच्या भावना या खूप मोठ्या असतात
शालेय वया पूर्वी (२.५ ते ५ वर्षापर्यंत) त्यांच्या भावना, लक्ष वेधून घेण्याची वृत्ती, मदत घेण्याची मागणी करत असतात. त्या भावना अतिशय तीव्र असतात, गोंधळात टाकणार्या आणि अवघड असतात. ती लगेच रडतात आणि परत हसूही लागतात.
तयार व्हा! शालेय वयापूर्वीच्या मुलांच्या भावविश्वात आणि एका वेगळ्याच वातावरणात आपण आता प्रवेश करणार आहोत.