निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेची नोव्हेंबर महिनाभराची महासभा एक महिनाभर लांबणीवर टाकली आहे. दिवंगत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहून सभा 20 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सभा आज (मंगळवारी)आयोजित केली होती. परंतु, महापौर राहुल जाधव परदेश दौ-यावर आहेत. उपमहापौर सचिन चिंचवडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे सत्ताधा-यांनी कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब केली.
सभेच्या सुरुवातीला येत्या 31 नोव्हेंबरला महापालिका सेवेतून निवृत्त होणारे कार्यकारी अभियंता विशाल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दिवंगत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आबा अभ्यंकर यांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना मांडली. त्याला नगरसेवक नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी महासभा 20 डिसेंबर दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले.