निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये थोरांदळे गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षीय मुलाला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरफ टीम चिमुरड्याला बाहेर काढण्यात यशस्वी झाली आहे. रवी पंडित मिल असे त्या चिमुरड्याचे नाव असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
रवी मिल बुधवारी बोअरवेलमध्ये 10 फूटावर अडकला होता. या बोअरवेलची एकूण खोली 200 फूट आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांचे पथक आणि एनडीआरएफ टीम त्वरित घटनास्थळी पोहचले. दरम्यान रवी सुरक्षित रहावा यासाठी ऑक्सिजनही सोडण्यात आला होते. १५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफच्या टीमकडून रवीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.