निर्भीडसत्ता न्यूज –
डंपरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी पाचच्या सुमारास केएसबी चौकातील पुलावर कुदळवाडीकडे जाणा-या रस्त्यावर घडला आहे. ओंकार मोरे (वय 19) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार दुचाकीवरून कुदळवाडीकडे जात होता. केएसबी चौकातील पुलावर त्याच्या दुचाकीला डंपरने मागून जोरात धडक दिली. या धडकेत ओंकार रस्त्यावर कोसळला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.