निर्भीड न्यूज –
– नाना काटे सोशल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
नाना काटे सोशल फाउंडेशनतर्फे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता आनंदी जेष्ठत्व डिस्काउंट कार्डचे वाटप माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर, शिवशंभो सेवा मंडळ सभागृहात होणार आहे.
महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी सामितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, राष्ट्रवादीचे नेते हनुमंत गावडे, मनपातील पक्षनेत्या मंगल कदम आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
नाना काटे सोशल फाउंडेशन व नगरसेविका शीतल काटे आणि राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल (नाना) काटे यांच्या ‘वतीने आनंदी जेष्ठत्व डिस्काउंट कार्ड’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.