निर्भीडसत्ता न्यूज –
आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मतदान जागृती करण्यात येत आहे. यात जवळपास 200 दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ देण्यात आली. अपंग सहाय्य संस्थेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, स्वप्नील भालेराव, रेवननाथ कर्डीले, रामचंद्र तांबे, प्रमोद घुले, प्रेमबाबु माणे आदी यावेळी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा (205) मतदार संघाचे दिव्यांग नोडल अधिकारी संभाजी ऐवले यांच्या नियंत्रणाखाली निगडीतील संत तुकाराम व्यापर संकुलात मतदान जागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग मतदारांना अधिकारी ऐवले यांनी मतदान करण्यासाठी शपथ दिली.