सातारा : बेलोशी, ता. जावली येथे एका मुलीने थायमेट खाल्ल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रणाली सिद्धार्थ खरात (वय १८) रा. बेलोशी, ता. जावली या मुलीने थायमेट खाल्ल्याने तिच्यावर प्रथम सोमर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. नंतर तिला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.