निर्भीडसत्ता न्यूज- पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम-उल-हक अनेक मुलींना फसवत असल्याचे प्रकरण आज (बुधवार) सोशल मीडियातून उघडकीस आले. एका ट्विटर युजरने इमामशी केलेले व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट ट्विटरवरून प्रसिद्ध केल्याने इमाम तमाम नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला. इमामने आपल्या स्टारडमचा चुकीचा वापर केला, असे फसवणूक झालेल्या तरुणींचे म्हणणे आहे.