शहरात जागतिक दर्जाचे तीन मजली पर्य़टन केंद्र
निर्भीडसत्ता न्यूज –
प्रभाग क्रमांक 11 मधील पूर्णानगर,चिंचवड येथील सेक्टर 18 मधील 6 एकर खाणीचा परिसरामध्ये जागतिक दर्जाचे तीन मजली पर्य़टन केंद्र साकारण्यात येणार आहे. या पर्य़टन केंद्राच्या माध्यमातून मनोरंजनासह स्थानिक नागरिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे शहराचे पर्यटन वाढून सौदर्यांत भर पडणार आहे.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शहरासह आपल्या प्रभागाच्या विकासावर अधिक भर दिला आहे. राज्यात पहिला अंडरपास शरदनगरमध्ये केला आहे. तसेच रस्ते, मैदाने विकसित केले आहेत. प्रभागामध्ये नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी पक्षनेते कसून प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रय़त्नातून पूर्णानगरमध्ये जागतिक दर्जाचे पर्य़टन केंद्र साकारत आहे. या प्रकल्पाचे काम थेट स्थापत्य विभागाकडून करण्यात येणार आहे. ठेकेदार बी.के.खोसे हे असून, कामाची मुदत 2 वर्षे आहे.
.तसेच पाच वर्ष देखभाल करायची आहे. या प्रकल्पासाठी एकूण 15 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
पर्यटन केंद्राचे विविध मनोरंजनाचे दालने असणार आहेत. पाथवे, हिरवळ, गजोबो, खेळणी, साहसीखेळ, तसेच जलतरण तलाव विकसित करणार आहे. त्यात पक्षीप्रेमींना पक्षीनिरीक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत लहान मुलांसाठी विविध खेळ तसेच इतर साहित्य उपलब्ध होणार आहे. भव्य असे प्रवेशद्वार असणार आहे. वर्कओव्हर ब्रिज, मॉडर्न फूड हब, वाहनतळासाठी सुटसुटीत जागा असणार आहे. या पर्यटन केंद्रामुळे शहरातील सौंदर्यांत भर पडण्यास मदत होणार आहे.
खानीच्या जागेत हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मनोरंजनासह रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे प्रभागासह शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या नुसार नियोजन केले आहे.