मुंबई:
‘सुपर ३०’ या हिंदी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या मंगळवारी (दि.30) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गरीब विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यावर ऋतिक रोशन यांचा हा चित्रपट आहे. उत्तर प्रदेश व राजस्थान सरकारने हा चित्रपट पूर्वी च करमुक्त केला आहे. चित्रपटास नागरिकाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बेठकीत झालेले अन्य निर्णय असे आहेत.
>> बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना.
>> पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यास पाणी वळविण्यासाठी नदीजोड योजनेस राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यास तत्त्वत: मान्यता देण्यासह सर्वेक्षण करण्यास मान्यता.
>> मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समूहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मान्यता.
>> राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता.
>> महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमार्फत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता.
>> इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR) संस्थेच्या स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथील २० एकर जागा नाममात्र दराने देण्यास मान्यता.
>> नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी १० कोटी मंजूर.
>> पर्यटन विकास व देखभालीसाठी एमटीडीसीला देण्यात आलेल्या अंबाझरी येथील ४४ एकर शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत ९९ वर्षे करण्यास मान्यता.
>> राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या परिरक्षेचे धोरण मंजूर.
>> दगड या गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या दरवाढीपैकी स्थगित केलेल्या दरवाढीच्या रक्कमेसंदर्भात निर्णय.