निर्भीडसत्ता न्यूज । प्रतिनिधी
सतीश साहेबराव सावंत (वय 30, रा. गणेशनगर, थेरगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गंग्या उर्फ रोहन वासू वाघमारे (वय 25, रा. चौधरी पार्क, वाकड), किरण संभाजी तनपुरे (वय 23, रा. गणेशनगर, थेरगाव), नण्या ढवळे (वय 25, रा. गणेशनगर, थेरगाव) आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर बडीशोप खाण्यासाठी घराच्या बाजूला असलेल्या टपरीवर आले. टपरीवरून आरोपींनी सतीश यांना पंचशील कॉलनी समोरील वीट भट्टीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात बोलावले. सतीश मैदानात गेले असता आरोपींनी किरण याचा भाऊ विकास तनपुरे हा कारागृहात असल्याचे सांगितले. त्याचा जमीन मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपये सतीश यांनी द्यावे, अशी आरोपींनी मागणी केली. सतीश यांनी पैसे देण्यास नकार दिला.
सतीश यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावरून आरोपींनी त्यांना कोयत्याने, बिअरची बाटली, हातातील स्टीलच्या कड्याने मारहाण केली. यामध्ये सतीश यांना हातावर पायावर, डोक्यात गंभीर दुखापत झाली. सतीश यांनी जमीन करण्यासाठी पैसे दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरून सतीश यांनी दुस-या दिवशी पैसे देण्याचे मान्य केले. पैसे देण्यास तयार झाल्याने आरोपींनी त्यांना सोडून दिले. असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.