निर्भीडसत्ता न्यूज |
पिंपरी विधानसभा मतदार संघातील 18 उमेदवारांना चिन्हांचे वाटप सोमवारी (दि.7) करण्यात आले. शिवसेनेचे आ. गौतम चाबुकस्वार यांना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. अण्णा बनसोडे यांना घड्याळ आणि बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड यांना हत्ती हे पक्षाचे आरक्षित चिन्ह मिळाले आहे.
बहुजन वंचित आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांना गँस सिलेंडर चिन्ह मिळाले. भाजपचे बंडखोर नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांना अंगठी चिन्ह मिळाले. बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे यांना खाट तर,भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे यांना ब्रेड चिन्ह मिळाले आहे.
अपक्ष उमेदवार अजय गायकवाड यांना हिरा, अजय लोंढे यांना शिट्टी, मुकुंदा ओव्हाळ यांना फुटबॉल, माजी नगरसेवक चंद्रकांत माने यांना पेनाची नीब सात किरणांसह, दीपक जगताप यांना शिवण यंत्र, दीपक ताटे यांना रोड रोलर, नरेश लोट यांना सफरचंद, मिनाताई खिलारे यांना प्रेशर कुकर, युवराज दाखले यांना ऑटो रिक्षा, डॉ. राजेश नागोशे यांना कोट आणि हेमंत मोरे यांना कप व बशी हे चिन्ह मिळाले आहे.