निर्भीडसत्ता न्यूज
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. शांततेच्या वातावरणात मतदान पार पडत असताना बोगस मतदानाचे गालबोट लागले आहे. पिंपरी येथे बोगस मतदानाच्या संशयावरून पिंपरी पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले आहे.
पिंपरीतील पिंपरी गाव येथील विद्या निकेतन शाळेत बोगस मतदानाचा प्रकार घडला आहे. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.