निर्भीडसत्ता न्यूज
साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवत आहेत. निवडणूक तोंडावर आली असताना उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादीकडून नरेंद्र पाटील हे रिंगणात आहेत.
दरम्यान, सात वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर सकाळीच उदयनराजे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर उदयनराजेंनी आजसहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.