मित्रांची दिवाळी…
दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाक्यांचा जल्लोष आणि फराळाची मेजवानी. दिवाळीचा सण हा आनंद, आतिशबाजी, झगमगते दिवे आणि नवीन स्टाईलने सजलेला असतो आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. दिवाळी म्हणजे आवडत्या माणसाला भेट वस्तू देणे, मग त्यात आपण मिठाई किंवा नवीन स्टाईलचे कपडे देतो.अशाच काहीश्या नव्या स्टाईलचा व्हिडियो कॅफेमराठीने प्रदर्शित केला आहे. हा कॅफेमराठीचा पँटालून सोबतचा एक खास व्हिडिओ आहे जो प्रेक्षकांना कॅफेमराठीच्या युट्युब चॅनलवर पाहायला मिळेल.
सध्याच्या ऑफिस लाईफ मध्ये दिवाळीसाठी शॉपिंग किंवा नवीन स्टाईलचे कपडे खरेदी करणे हे खूपच अवघड झाले आहे. पण ह्या धावपळीच्या जीवनातही एकत्रित होऊन एका कुटुंबाप्रमाणे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत दिवाळी कशी साजरी करता येईल ह्याच उत्तम दर्शन त्यांनी ह्या व्हिडियो मध्ये दाखवण्यात आले आहे.