तब्बल नऊ दिवस गाठीभेटीचा उपक्रम
निर्भीडसत्ता न्यूज |
पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका आणि शहरासंदर्भातील कामे आणि कार्यक्रमाच्या व्यापात व्यस्त होते. त्याची मुदत 21 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या शेवटच्या टप्प्यात जाधववाडी, चिखली प्रभाग क्रमांक दोनसाठी 9 दिवसांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे.
महापौर जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या पदाची मुदत 21 नोव्हेंबला संपत आहे. त्या दिवशी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होऊन नवीन महापौर व उपमहापौर निवडला जाणार आहे. महापौर पदाची आपली मुदत संपत आल्याने महापौर जाधव यांना आता आपला प्रभाग आठवला आहे.
प्रभागासाठी सोमवार (दि.4) ते मंगळवार (दि.11) असा 9 दिवसांचा पाहणी दौरा त्यांनी आखला आहे. प्रभागातील बोर्हाडेवाडी, हजारे वस्ती, नागेश्वर नगर, वाघेश्वर कॉलनी, कुदळवाडी, बोल्हाईचा मळा, हाउसिंग सोसायट्या, शिवतेज नगर, किवळे आदी भागांना ते भेट देऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहे. प्रभागांतील समस्या जाणून घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत पालिका अधिकार्यांना सूचना करणार आहेत. महापौर पद संपत असल्याने शेवटच्या टप्प्यात महापौर जाधव यांनी प्रभागाचा दौरा आयोजित केल्याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.