थिएटर वर्कशॉप कंपनी आयोजित ‘पैस करंडक’ खुली राज्यस्तरीय एकपात्री आणि मुकनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडली. चिंचवडच्या पैस रंगमंचावर ही स्पर्धा रंगली. नऊ आणि 10 नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा घेण्यात आली. कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने भरवलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून कलाकारांचा प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कला ,क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे, उद्योजक दत्तात्रय गव्हाणे, चित्रपट संकलक बी. महांतेश्वर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण रंगकर्मी किरण येवलेकर, समीर कालमित्रा यांनी केले.
तुषार हिंगे यावेळी बोलताना म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात कलाकारांसाठी सुरु केलेल्या ‘पैस’ करंडकला पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धांमुळे चांगले कलाकार घडतात. शहरात अशा स्पर्धांचे आयोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
एकपात्री स्पर्धा आणि मुकनाट्य स्पर्धेकरिता कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक, पुणे येथून कलाकारांनी सहभाग घेतला होता. एकपात्री स्पर्धा लहान आणि मोठा अशा दोन गटांत पार पडली. सांघिक मुकनाट्य स्पर्धेत कलापिनी,तळेगाव दाभाडे यांनी प्रथम क्रमांक, रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक तर नादब्रह्म(एमआयटी) संस्थेने (तृतीय) क्रमांक मिळवला. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांना उत्तेजनार्थ, नवरसम नाट्यसंस्थेने विशेष उत्तेजनार्थ, तसेच रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय यांना लेखनाचे पारितोषिक मिळाले.
एकपात्री स्पर्धेत लहान गटात सान्वी भाके(प्रथम), सावनी दात्ये(द्वितीय), श्रावणी मेस्त्री(तृतीय) क्रमांक मिळवला. तर पार्थ फडणीस, कल्याणी पानस्कर, राधा बेलसरे यांना उत्तेजनार्थ तसेच सुयश सावंतने विशेष उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. एकपात्री स्पर्धेत मोठ्या गटात चैतन्य सातभाई(प्रथम), सीमा शेरकर(द्वितीय), रुचिका भोंडवे(तृतीय) क्रमांक मिळवला. कौस्तुभ शाळीग्राम, राहुल शेलार, सुमंत शिंदे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
प्रभाकर पवार यांनी प्रास्ताविक केले. सचिन बहिरगोंडे, बाळकृष्ण पवार यांनी रंगमंच व्यवस्था केली. अक्षय यादव आणि सुजाता कांबळे यांनी प्रकाशयोजनेच्या नियोजनात सहभाग घेतला. राजू भोसगे आणि सुरेश मद्रे यांनी संगीत संयोजन केले. शुभम लोहार, सुचित्रा गवळे यांनी संयोजनात भाग घेतला. रश्मी घाटपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका राजे यांनी आभार मानले.