निर्भीडसत्ता न्यूज ।
भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, आधुनिक भारताचे राष्ट्रपिता, सामाजिक न्यायाचे प्रणेते, शोषितांचे उद्धारक, सामाजिक समतेचे उद्बोधक व स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनी आज पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने अभिवादन सभेद्वारे मानवंदना देण्यात आली.
पिंपरी चौकातील भिमसृष्टी शिल्प परिसरातील डाॅ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सामूहिक वंदना घेण्यात आली.
अभिवादन सभेस उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र बनसोडे म्हणाले, “बाबसाहेबांचे कार्य हे केवळ एका समाजासाठी मर्यादित नसून ते समस्त मानवजातीच्या अधिकारांसाठी चे एक क्रांतीकारक बंड होते, केवळ एका समाजापूरते बाबासाहेब कधीच मर्यादित नव्हते सर्वांच्या सर्वांगीण उन्नती साठी ते आयुष्यभर झटत राहिले व परिणामी संविधानातून बाबसाहेबांनी मानवतावाद, स्वातंत्र्य, बंधुता व समता दर्शविली ह्या जीवन मुल्यांच्या आधारेच आज आपले जीवन समृध्द होत आहे. आजच्या तरूणांनी ख-या अर्थाने शिका संघटित व्हा व संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे वागणे गरजेचे आहे व हाच संकल्प आज या महापरिनिर्वाण दिनी करूया “असे आवाहन बनसोडे यांनी केले.
या प्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते श्रीरंग सरपाते, उमेश बनसोडे, निळकंठ तागतोडे, जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, सिध्दार्थ वानखेडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवराज ढोरे, हरप्रित सिंग, प्रकाश निसर्गंध, पांडूरंग वीर, सुभाष वाघमारे, लक्ष्मण म्हेत्रे, विशाल कोळी, अक्रम शेख, दिपक भंडारी, गौरव चौधरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.