निर्भीडसत्ता न्यूज ।
अंशुल क्रिएशन च्या वतीने
अक्षर मुद्रणातून रेखाटलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० अक्षरचित्रांचे भव्य प्रदर्शन देशात प्रथमच चिंचवडयेथे भरत आहे.
शहरातील प्रसिद्ध कलाकार
श्रृती गणेश गावडे या मुलीने ही अक्षरचित्रे साकारली असून अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या कलेच्या
माध्यमातून प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्वाची प्रथमच तिने
यंदा निवड केली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील
कलादालनात १५ ते १७
डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन
सर्वांना पाहता येणार आहे.
शरद पवार यांच्या नावापुढे
जी विशेषणे आदराने व
अभिमानाने लावली जातात अशा अकल्पनिय, अफाट,
अद्भुत, अजिंक्य, अजातशत्रू, करारी, कर्तृत्ववान, कष्टाळू,
कर्मठ, कर्दनकाळ, खतरनाक, खमका, खनखणीत, खेळाडू, खेळीया, गतिमान, गहिवर, घमासान, घातक, चतुरस्त्र,
चौफेर, चमत्कारिक, चळवळ,
चिरतरुण, छावा,
छातीठोक, छत्र, छबिदार,
जिवलग, जिवंत, जिगरबाज, जिद्द, जेता, झंजावात,
टोकदार, टस्सल, ठाणेदार,
ठसनी, डोंगर, डरकाळी,
ढाण्यावाघ, तलवार, तल्लख,तरुण, तगडा, तफडदार,
थलैवा, दैदिपयमान दृष्टा, धडाकेबाज, धाक, धमक,
ध्यैर्यवान, निर्णायक, निरंकार, पैलवान, पटाईत, प्रबळ,
प्रेमळ पिता, फुत्कार, बेधडक, बिनधास्त, बेफिकीर, बुलंद, बाहुबली, भावूक, भारावलेला, भला, मजबूत, मेहनती,
माणूस, मशाल, योगी, यत्न, यार, यातना, रांगडा, राही,
राजामनाचा, ललकार,
लक्षभेदी, वस्ताद, विचार,
विज्ञानवादी, वैश्विक विद्यापीठ, शिकारी, शांत, शाही, संयमी, सहिष्णु, सत्कार, सदाचारी,
हरफनमौला, हक्काचा, क्षत्रियआणि ज्ञानी या ८० शब्दातून शरद पवार यांची ८०
अक्षरचित्रे श्रृतीने चितारली
आहेत. अंशुल क्रिएशन हि
संस्स्था व त्याचे प्रमुख विजय जगताप हे कला व कला
विषयक उपक्रम राबविण्याचे काम शहरात करतात.या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी
नगरसेवक व लिगल सेलचे
अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे
यांची साथ व सहकार्य
त्यासाठी लाभले आहे.
श्रृतीने या पूर्वी बीग बी
अमिताभ बच्चन यांची ७७ अक्षरचित्रे त्यांच्या ७७ व्या वाढदिवशी तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविले होते.