निर्भीडसत्ता न्यूज ।
चिंचवड महापालिकेचे ‘सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिल्टी) अॅक्टिव्हीटी’ या विभागाचे अधिकारी विजय वावरे यांची सहा महिन्याऐवजी थेट 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या गतीमान कामकाजाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
पालिकेने सीएसआर सेल स्थापन केला आहे. त्यासंदर्भातील कामासाठी विजय वावरे यांची प्रत्येकी 6 महिन्यांसाठी मानधनावर निवड केली होती. मात्र, या पुढे त्यांची थेट 36 महिने म्हणजे 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यांना दरमहा 77 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. त्या कर अतिरिक्त आहे. या मानधनात दरमहा 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. असे एकूण 3 वर्षांसाठीच्या मानधनासाठी 30 लाख 58 हजार 440 खर्च येणार आहे.
या उमेदवार निवडीसाठी वावरे, अरूणिमा दंडवते. तरूण म्हस्के, भास्कर कृष्णमूर्ती यांचे अर्ज पात्र झाले होते. त्यात वावरे हे 100 पैकी 95 गुणांसह पात्र ठरले असल्याचा दावा महिती व तंत्रज्ञान विभागाने केला आहे. या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत्या शुक्रवारी (दि.27) होणार्या स्थायी समिती सभेसमोर आहे.