निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्या रस्ते रूंदीकरण कामासह खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पासाठी आणि नागरिकांच्या अर्जानुसार शहराभरातील एकूण 200 झाडे तोडण्यात येणार आहे. त्यास वृक्ष प्राधिकरण समितीने सोमवारी (दि.23) मंजुरी दिली.
समितीच्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसेवक शीतल शिंदे, भाऊसाहेब भोईर, शाम लांडे, संतोष लोंढे, सदस्य संभाजी बारणे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे व अधिकारी उपस्थित होते.
पालिकेच्या रस्ते रूंदीकरणास अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव होता. त्यावर शीतल शिंदे व शाम लांडे यांनी आक्षेप घेतला. स्थापत्य विभाग निविदा राबविते. त्यासाठी नेमलेल्या आर्किटेक्टने किती झाडे वाचविता येतात, याचा अभ्यास केला आहे का. ती आकडेवारी समितीसमोर का सादर केली जात नाही. पुढील सभेत स्थापत्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहावेत, अशी सूचना सदस्यांनी केली.
स्थापत्य विभाग विविध कामांची निविदा प्रकिया राबवून मोकळी होते. कामास अडथळा ठरणारी झाडे तोडण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाकडे पाठविला जातो. उद्यान विभाग ती झाडे तोडण्यास तयारच बसलेली असते. स्थापत्य व उद्यान विभागाची ही घाई गडबडीवर सदस्यांनी टीका केली.
सभेत बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पासाठी झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, नारळ व फणसाच्या झाडांमुळे नुकसान व दुर्घटना होण्याची भिती असल्याने ते झाडे तोडण्यासाठी नागरिकांनी अर्ज केले होते. त्यास समितीने मंजुरी दिली.
वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घ्यावी. शहरातील कलाकारांची मदत घेऊन पथनाट्य, गाणे आदी माध्यमातून प्रबोधन करावे, असा सदस्य प्रस्ताव समितीने मंजुर केला.