निर्भीडसत्ता न्यूज –
महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. मंत्रिमंडळातील ३६ जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शपथविधी सोहळ्यात २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. शपथविधीसाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती, मात्र विरोधकांची शपथविधीसाठी अनुपस्थिती होती.