निर्भीडसत्ता न्यूज ।
पिंपरी-चिंचवड : नवीन वर्षाच्या सुरुवातीला जन्माला येणाऱ्या बालकाविषयी नेहमीच उत्सुकता असते. यावर्षी शहरात नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ६८ बालकांचा जन्म झाल्याची नोंद झाली आहे.
महापालिकेच्या वायचीएम हॉस्पिटलमध्ये १५, भोसरी रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये १३, आकुर्डी १२, प्राधिकरण २, थेरगाव रुग्णालयाअंतर्गत ७, तालेरा १०, जिजामाता १, पिंपरी वाघेरे रुग्णालय ४ तर सांगवी येथील रुग्णालयात ४ अशा एकूण ६८ नवजात बालकांची नोंद झाली आहे.
स्त्रीभ्रुण हत्येचा विषय नेहमीच चर्चेत असतो त्यामुळे नवजात बालकांमध्ये मुलींची संख्या विचारात घ्यावी लागते. यावर्षी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जन्माला आलेल्या ६८ बालकांपैकी ३८ मुली आहेत.