निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी येथे पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्यावतीने प्रभाग क्र. २१, पिंपरी वाघेरे येथे कै . अनुसयाबाई वाघेरे प्राथमिक शाळेच्या आवारात २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे माजी कार्यकारी अभियंता कै. दिलीप गुलाबराव कुदळे असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर महापौरांच्या हस्ते जलकुंभाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नागरसदस्य संदीप वाघेरे, सहशहर अिभयंता मकरंद निकम, माजी नागरसदस्य रंगनाथ कुदळे, जनसपंर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते सिदाजी गोलांडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप वाघेरे यांनी केले. सूत्रसंचालन जनसपंर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले व शेवटी आभार मानले.