निर्भीडसत्ता न्यूज
पुणे महानगर परिवहन महामंडळात वर्षांनुवर्षे काम करणा-या रोजदांरी कर्म-यांना नुकतेच कायम करण्यात आले. त्यानूसार ‘पीएमपीएल’च्या रोजदांरी चालकांना कायम करावे, अशी मागणी चालकांनी केली आहे.
याबाबत पिंपरी चिंचवडच्या महापाैर उषा ढोरे यांना पीएमपी राेजदांरी काम करणा-या चालकांकडून निवेदन देण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी देखील उपस्थित होते. दरम्यान, सदरील कर्मचा-यांना योग्य न्याय देण्यात येईल, याबाबत पीएमपी सभेत मुद्दा उपस्थित करुन त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महापाैरांनी चालकांना दिले.