निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामाच्या तब्बल 117 कोटी खर्चाच्या कामांना स्थायी समितीने बुधवारी (दि.15) मंजुरी दिली. त्यामध्ये रस्ते विषयक कामे सर्वांधिक आहेत.
सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. प्रभाग क्रमांक 8 येथील तिरुपती चौक येथील तुलसी हाईट्ससमोरील रस्ता ते सेक्टर क्रमांक 1 ला पुणे- नाशिक महामार्गापर्यंत जोडणारा 12 मीटर डीपी रस्ता विकसित कण्यासाठी 6 कोटी 82 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 31 मधील रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी 3 कोटी 37 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 31 मधील क्रांती चौक ते शनी मंदीरपर्यत रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी 3 कोटी 29 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 22 मधील जोतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा रस्त्याचे क्रॉकीटीकरण करण्यासाठी 5 कोटी 41 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्राधिकरण, गंगानगर भागातील रस्त्याचे क्रॉकीटीकरणासाठी 5 कोटी 75 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 19 मधील अंतर्गत रस्ते मजबुतीकरणासाठी 3 कोटी 11 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. दुर्गा कॉर्नर ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हा रस्ता मजबुतीकरणासाठी 6 कोटी 58 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 31 मधील सांगवीतील ढोरे फार्म ते फेमस चौक रस्त्यासाठी 3 कोटी 37 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 20 येथील संत तुकाराम नगर येथील उपरस्ते विकसित करण्यासाठी 3 कोटी 29 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.प्राधिकरण एडीसी परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी 5 कोटी 24 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 1 चिखली येथील राधास्वामी आश्रम येथील 24 मीटर डीपी रस्ता विकसीत करण्यासाठी 9 कोटी 41 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
पालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रेफ्रिजरेशन व एयर कंडीशनिंग मेकॅनिक या व्यवसायाचे नुतनीकरण व अद्यावतीकरण करण्यासाठी 4 कोटी 70 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. गणेश तलावामधील गाळ काढण्यासाठी 42 लाखांचा खर्च केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये पुणे -नाशिक महामार्गाचे पश्चिमेकडील नाला विकसित करण्यासाठी 5 कोटी 20 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. भोसरीतील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रात विद्युत विषयक कामे करण्यासाठी 3 कोटी 79 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 10 मधील पिंपरी येतील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच, त्याअनुषंगिक कामे केली जाणार आहे. त्यासाठी 1 कोटी 63 लाख खर्चास समितीने मान्यता दिली.
शिक्षण समितीचे विषयाना खो
महापालिका शाळांसाठी नाट्यशास्त्र तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ नेमणे. सातवीच्या विद्यार्थ्यांना टॅब खरेदी करणे. पहिली व दुसरीच्या 11 हजार 208 विद्यार्थ्यांना स्वच्छताकिट खरेदी करणे. आदी सदस्य प्रस्ताव मंजुर करून शिक्षण समितीने मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविले होते. सभेत हे प्रस्ताव मागे घेण्यात आले