मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा तान्हाजी (द अनसंग वॉरियर’)हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण बहुचर्चित हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. प्रदर्शनानंतर अवघ्या सहा दिवसात चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. महाराष्ट्रात चित्रपट तुफान गाजतोय, त्यासोबतच देशभरातही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
अजय देवगण, सैफ अली खान आणि काजल स्टारर या चित्रपटाने शुक्रवारी 15.10 कोटी, शनिवारी 20.57 कोटी, रविवारी 26.26 कोटी, सोमवारी 13.75, मंगळवारी 15.28 कोटी रुपये आणि बुधवारी 16.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहा दिवसात मिळून चित्रपटाने 107.68 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 100 करोड क्लबमध्ये स्थान मिळवणारा ‘तान्हाजी…’ या वर्षातला पहिला चित्रपट ठरला आहे.