निर्भीडसत्ता न्यूज ।
चिंचवड स्टेशन येथील दवाबाजार मधील दुकानदारांनी फुटपाथ गिळंकृत केले आहे. फुटपाथवर झालेली अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीने महापालिकेकडे केली आहे.
याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव इंगळे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, चिंचवड स्टेशन येतील दवाबाजार मधील दुकानदारांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. फुटपाथवर अनधिकृत बांधकामे केली आहेत. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. नागरिकांना फुटपाथवरून चालत येत नाही. त्यामुळे तत्काळ फुटपाथवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष अजित संचेती, युवा प्रदेश उपाध्यक्ष संदीप गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विकास कापसे, पिंपरी-चिंचवड युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके, युवा उपाध्यक्ष पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.