निर्भीडसत्ता न्यूज ।
महापालिकेचे भाजपाचे महापौर आणि उपमहापौर यांनी पक्षाच्या आदेशानुसार आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गेली अनेक दिवस सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
महापालिकेवर सध्या भाजपाच्या संगीता खोत महापौर आहेत. तर धीरज सूर्यवंशी हे उपमहापौर आहेत. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी याबाबत राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहेत. महापौर उपमहापौर निवडीवेळी दोन्ही पदाधिकारी यांना सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपूनही अद्याप महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामे दिले नसल्याने याबाबत काही इच्छुकांनी भाजपा श्रेष्ठीवर दबाव टाकत पदाधिकारी बदलण्याची आग्रही मागणी केली होती. यानुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली महापालिकेचे महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी राजीनामे द्यावेत असे आदेश दिले होते.
यानुसार आज सांगली महापालिका सभेच्या अखेरीस महापौर संगीताताई खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौर संगीताताई खोत यांच्याकडे तर महापौर संगीताताई खोत यांनी आपला महापौर पदाचा राजीनामा आपला राजीनामा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे सोपवले आहे. महापौर उपमहापौर यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे. महापौर पदासाठी सविता मदने आणि गीता सुतार आणि कल्पना कोळेकर हे भाजपाकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.