निर्भीडसत्ता न्यूज ।
माजी महापौर राहुल जाधव महापौर चषक टिन 20 शालेय बास्केटबॉल स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलने विजडम वर्ल्ड स्कूलचा 26-20 असा 6 गुणांनी पराभूत करीत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा संभाजीनगर, चिंचवड येथील कलमनयन बजाज स्कूल येथे सुरू आहे. मुलींच्या 17 वर्षांखालील गटात इन्फट जिजस स्कूलने सेंट उर्सुला स्कूलचा 25-4 असा 21 गुणांनी सहज पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर तथा क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका मंगला कदम, अनुराधा गोरखे, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, क्रीडा शिक्षक राजेंद्र महाजन, मुग्धा देशपांडे आदी उपस्थित होते. ऐश्वर्या साठे यांनी सुत्रसंचालन केले. तर, वैशाली साळी यांनी आभार मानले.