‘सैराट’ सिनेमातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिला सैराटमुळे पैसे, प्रसिद्धी आणि प्रेक्षकांचे खूपसारे प्रेम देखील मिळाले. तसेच मूळची अकलूज असलेल्या रिंकूला तिच्या अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.
बॉलीवूड मधील कलाकाराच्या मानधनाची जशी चर्चा होत असते, तशी आता मराठी कलाकारांच्या मानधनाचे आकडे देखील आश्चर्य चकित करणारे आहे. मराठी चित्रपटसृष्टी मधील इतर कलाकारांपेक्षा रिंकू राजगुरु सर्वात महागडी अभिनेत्री झाली आहे.
रिंकूच्या आगामी चित्रपट ‘मेकअप ‘ यासाठी तिने तब्बल २७ लाख रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या प्रसिद्धीमुळे निर्मात्यांनी रिंकूला जास्त मानधन देणेच फायद्याचं ठरणार आहे. हा मान रिंकूने आपल्या कामातून मिळवला.